बेळगाव: कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीतील मन्नीकेरी गावांमधील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या सरकारी कन्नड हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र व युवा नेते राहुल जारकीहोळी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये या नूतन इमारतीचे शाळा सुधारण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्षांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी युवा राहुल जारकीहोळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मंत्री सतीश जारकेवाडी यांच्या आमदार निधीतून या नूतन इमारत बांधण्यात आली आहे. तसेच याप्रमाणे पुढेही काही आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही ते पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले.तसेच शाळेमध्ये जर शिक्षक चांगले असतील तर विद्यार्थी हा चांगला घडतो.त्यासाठी शिक्षकांनी योग्य पद्धतीचे शिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे.
याप्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य मारुती सनदी, यल्लाप्पा तेरणी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,पुंडलिक खाजगोनाट्टी, राहुल जाधव, भरमा सनधी, भीमा हदलगी , अव्वांना खाजगोनाट्टी, सत्यपा होस्पेट, मल्लाप्पा दड्डीकर,हमन्ना पाटील यांच्यासहित शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.