*मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश*
865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये येळ्ळूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेने घवघवीत यश संपादन केले. ही सामान्य ज्ञान स्पर्धा बेळगाव, खानापूर व येळ्ळूर अशा तीन विभागांमध्ये घेण्यात आली होती. ही स्पर्धा तिसरी ते पाचवी लहान गट व सहावी ते सातवी मोठा गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली.
येळळूर केंद्रावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये येळ्ळूर परिसरातील 14 शाळांतील जवळपास 800 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविले. लहान गटामध्ये रचना मोहन धामणेकर प्रथम क्रमांक, सुशांत संदीप घाडी द्वितीय, वैष्णवी शिवाजी कणबरकर सहावा, तन्वी संतोष पाटील सातवा, आराध्या मनोज कानशिडे आठवा तसेच मोठ्या गटांमध्ये जिज्ञेश रवींद्र गुरव दुसरा, परम जोतिबा पाटील तिसरा, आराध्या मूर्तीकुमार माने चौथा, तेजल कपिल कानशिडे सहावा, सोहम उमेश पाटील नववा, श्रेया सुरेश काकतकर दहावा क्रमांक अशा एकूण 11 विद्यार्थ्यांचा या परीक्षेमध्ये क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. एम्. चलवादी आणि संपूर्ण शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.