बेळगाव:अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मराठा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने सत्ता कायम राखली. केवळ सामान्य गटातील एक जागा वगळता सर्व जागांवर विजय मिळवला. त्यामुळे बँकेत विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार यांच्या नेतृत्वाच्या गटाचीच सत्ता असणार आहे. या अगोदर प्रशांत चिगरे हे ओबीसी अ गटातून बिन विरोध निवडून आले आहेत.
रविवारी दिवसभर मराठा बँकेसाठी अगदी चुरशीने मतदान झाले. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर गर्दी केली होती. अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांनी विजय मिळविला. त्यांना 841 इतकी मते मिळाली. तर त्यानंतर राखीव महिला गटातून रेणू किल्लेकर आणि दिपाली दळवी यांनी विजय मिळविला. त्यांना अनुक्रमे 1063 व 868 इतकी मते मिळाली. त्यानंतर इतर मागास ब गटातून विश्वजीत हसबे यांनी विजय मिळविला. त्यांना 791 इतकी मते मिळाली. अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी विजय मिळवला. त्यांना 921 इतकी मते नक्की मिळाली. सत्ताधारी गटातील पॅनल मधील कदम पाटील यांना विद्यमान संचालक लक्ष्मण होनगेकर यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. विनायक होनगेकर हे नवव्या जागेसाठी निवडून आले. निकाल घोषित करण्यात आला त्यावेळी समर्थकांकडून फटाके वाजवून जल्लोष करण्यात येत होता. सामान्य 9 जागांसाठी विजयी उमेदवार
दिगंबर पवार 921 मते , बाळाराम पाटील 883 मते , बाळासाहेब काकतकर 868 ,विनोद हंगिरकर 863 , मोहन चौगुले 783, विश्वनाथ हंडे 771 , मोहन बेळगुंदकर 733 , लक्ष्मण होनगेकर 655 , विनायक होनगेकर 648 . हे सर्व उमेदवार विजयी ठरले.