मराठा को-ऑपरेटिव्ह बँक बेळगाव संचालक मंडळाच्या प्रचार धुमधडाक्यात
बेळगाव: चवाट गल्ली मध्ये मराठा को-ऑपरेटिव्ह बँक बेळगाव संचालक मंडळाच्या प्रचार धुमधडाक्यात झाला. सुरुवातीला श्री मारुती (बजरंगबली)यांचे पूजन करून प्रचारास प्रारंभ झाला. कार्यालयांमध्ये सर्व सभासदांना एकत्रित करण्यात आले.त्यानंतर चव्हाट गल्लीच्या वतीने बेळगाव अर्बन बँकेचे नवनिर्वाचित श्री प्रदीप अष्टेकर यांचा सन्मान करण्यात आला.
मराठा को-ऑपरेटिव्ह बँकचे हित लक्षात घेऊन सामान्य गटातील श्री सुनील अष्टेकर व श्री शरद परशराम पाटील यांनी प्रचारातून माघार घेऊन सत्ताधारी पॅनलला पाठिंबा दिला मागास ‘ब’ गटातील “मोतेस बारदोसकर”यांनी श्री हसबे विश्वजीत अमृतराव यांना पाठिंबा घोषित करून स्वतः प्रचारातून माघार घेतली. माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचा शाल व हार घालून सन्मान करण्यात आला. त्याबरोबर मागास ‘A’ गट बिनविरोध करण्यासाठी श्री गिरीश धामणकर यांनी माघार घेतला होता.
म्हणून त्यांचाही सन्मान केला.श्री बाळासाहेब काकतकर व श्री दिगंबर पवार चेअरमन यांनी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीविषयक आढावा सांगितला. महिला गटातील सौ रेणू सुहास किल्लेकर यांनी मतपत्रिकेचे स्वरूप समजावून दिले. मतदारांनी एकूण १४ शिक्के मारावयाचे असून पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवर २,३,४,५,७,९,१०,११,१२ या क्रमांकावर ९ मते, गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर १,२ क्रमांकावर २ मते पिवळ्या मतपत्रिकेवर ३ क्रमांकावर १ आणि निळ्या मतपत्रिकेवर १ क्रमांकावर १ व हिरव्या रंगाच्या मतपत्रिकेवर १ क्रमांकावर एक असे १४ शिक्के मारण्यास सांगितले. चवाट गल्लीचे पंच श्री प्रतापराव मोहिते यांनी सर्व उमेदवारांना पाठिंबा घोषित केला.
सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येणार असे सांगितले सूत्रसंचालन श्री प्रफुल शिरवलकर यांनी केले यावेळी श्री उदय किल्लेकर,श्री किसन रेडेकर, श्री चंद्रकांत कणबरकर, श्री प्रवीण कुट्रे , रोहन जाधव, सत्यम नाईक, लता किल्लेकर, श्वेता पवार, श्रद्धा पवार उपस्थित होते.