सि.टी रवी यांच्या विरोधात महिलांचा आक्रोशत व्यक्त
हिवाळी अधिवेशन काळात MLC सि.टी रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अश्लील व्यक्तव्य केल्यामुळे शनिवारी हेब्बाळकर समर्थकांनी आक्रोश व्यक्त केला.तसेच क्लब रोड येथून एमएलसी सी.टी रवी यांची अंत्यविधी काढून कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे त्यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे सिटी रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात जे अश्लील व्यक्तव्य केलेला आहे त्याकरिता त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी बेळगाव ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने महिला या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.