बेळगाव: कडोली गावामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून आज १ कोटी १२ लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव युवा नेते राहुल जारकीहोळी व कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते हस्ते भूमिपूजन करून १ कोटी १२ लाखांच्या विकास कामाला चालना देण्यात आली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आमदार निधीतून
सी सी रस्त्याच्या ९० लाख रुपये,तलाव करिता ५० लाख रुपये,स्मशानाचे सुशोभीकरण ५ लाख रुपये,अंगावाडी नूतन इमारती करिता २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
याप्रसंगी बोलताना युवा नेते राहुल जारकिहोळी म्हणाले की मंत्री सतीश जारकिहोळी व खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी विकास कामाला चालना दिली आहे. काम योग्यरित्या करून घेण्याचे त्यांनी सांगितले तसेच यापुढेही कोणतेही काम असल्यास ते पूर्ण करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा.प. अध्यक्ष सागर पाटील, उपध्यक्ष दीपा मारगाळे,सदस्य राजू मायानाचे,काँग्रेस नेते राहुल जाधव,ठेकेदार सी एस पम्मार,सहाय्यक अभियंता श्रीधर उपस्थित होते.