स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री व आमदारांनी केला दौरा
बेळगांव: कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगांव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सैठ,युवा नेते अमान सैठ आणि अल्पसंख्याक आणि गृहनिर्माण मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांच्यासह उत्तर भागातील परिसरांना भेट दिली. रहमत नगर, वैभव नगर, मदनी स्कूल, बसव कॉलनी, वीरभद्र नगर, उज्वल नगर, न्यू गांधी नगर आणि अमन नगर या परिसरात भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
या दौऱ्यातील प्रमुख म्हणजे या परिसरांमध्ये मूलभूत सुविधा देणे.रहमत नगर, वैभव नगर आणि बसव कॉलनी सारखे भागात खराब रस्त्यांची स्थिती, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि अपुरा पाणीपुरवठा यासारख्या समस्यांनी स्थानिक रहिवासी ग्रासले आहेत.आसिफ सैठ यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की सध्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात या समस्या मांडल्या जातील व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी उपाय योजना केल्या जातील.
या भेटीदरम्यान आसिफ सैठ व बीझेड जमीर अहमद खान यांच्यासाठी त्यांना स्थानिक समस्या समजू शकल्या आहेत,ते विधानसभेत मांडू शकतात व याप्रसंगी बोलताना म्हणाले की हिवाळी अधिवेशनात स्थानिक समस्या मांडण्याचे आश्वासन दोन्ही त्यांनी दिले.