बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथे मध्यरात्री साडे तीन वाजता भीषण आग लागून आगीत सात दुकानांचे नुकसान झाले.आगीत उर्दू शाळेला देखील आग लागून नुकसान झाले.
खंजर गल्ली येथे असणाऱ्या स्क्रॅप दुकानाला मध्यरात्री साडे तीन वाजता आग लागली. रात्रीची वेळ असल्याने आग लागल्याचे लोकांना समजे पर्यंत आजूबाजूच्या दुकानांना देखील आग लागली.आगीत सात दुकानांचे मोठे नुकसान झाले.आगीमुळे तेथे असणाऱ्या उर्दू शाळेचे देखील नुकसान झाले आग लागल्याचे ध्यानात येताच तेथील आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.अग्निशामक दलाने अखेर पाच तासाच्या अथक प्रयत्नांनी आग विझविली.