बेळगाव:अनगोळ येथील विश्वकर्मा मनोमय संस्थेच्या वतीने अनगोळ श्री विश्वकर्मा महिला मंडळाची स्थापना रविवारी करण्यात आली.यानिमित्त विश्वकर्मा मंदिर येथे आयोजित बैठकीत मंडळाचे सरचिटणीस सचिन सुतार यांनी सर्वांचे स्वागत केले. व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बैठकीत समाजातील महिलांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. समाजातील महिलांच्या व मुलींच्या शिक्षण,उद्योग ,बचत गट ,विवाह सोहळ्यातील अडचणी ,महिलांच्या व मुलींच्या समस्या, समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ,खेळाडूंना प्रोत्साहन,विधवा महिलांना मदत अशा अनेक विषयांवर उपाययोजना करण्यासाठी समाजात महिलांनी एकत्रितपणे संघटित होऊन समाजाच्या उन्नतीसाठी व समाजाच्या प्रगतीसाठी संघटना स्थापन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.अनगोळ श्री विश्वकर्मा महिला मंडळाची स्थापना या बैठकीत करण्यात आली.यावेळी सदर कार्यकारणीची निवड ही ३ वर्षासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले.
नूतन कार्य करणे पुढील प्रमाणे अध्यक्ष वनिता सुतार, कार्याध्यक्ष अलका लोहार, उपाध्यक्ष सुजाता मुचंडीकर, सरचिटणीस लक्ष्मी लोहार,उपसरचिटणीस रेणुका सुतार, खजिनदार सरिता सुतार, उपखजिनदार सुधा सुतार,हिशोब तपासणी सुवर्ण काळे लोहार, निर्मला बडगेर ,तेजस्वी लोहार याशिवाय सांस्कृतिक कार्यकारणी मंडळ निवडण्यात आले.
श्री विश्वकर्मा कमिटीतर्फे अध्यक्ष वनिता सुतार व सरचिटणीस लक्ष्मी लोहारे यांचा मालू नारायण लोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विश्वकर्मा मनोमय संस्थेच्या कमिटीच्या वतीने सरचिटणीस सचिन सुतार यांनी सर्वांचे आभार मानून नूतन श्री विश्वकर्मा महिला मंडळाला त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे व विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले सरचिटणीस लक्ष्मी लोहार यांनी आभार मानले.