सरकारी झाडांना रंगकाम
बेळगाव:
येळ्ळूर – वडगाव रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सरकारी मालकीच्या झाडांना सरकारच्या संबंधित विभागाकडून रंगकाम करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी येळ्ळूर वडगाव रस्त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात आले होते.
त्यानंतर आता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या सरकारी मालमत्तेच्या झाडांना रंगकाम करण्यात येत आहे. झाडांना लाल आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे लावण्यात येत आहेत.यामागे सरकारी झाडांची चोरी होऊ नये असा उद्देश आहे. यावरून संबंधित खाते जागरूक असल्याचे दिसून येत आहे.