बेळगाव : प्रसूतीनंतर आपल्या नवजात मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेलेल्या निर्दयी मातेला पोलिसांनी अटक केली असून, तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. बैलहोंगल येथील महिला बिबीजान सद्दाम हुसैन सय्यद ही महिला प्रसूतीसाठी ८-१२-२०२४ रोजी बिम्स रुग्णालयात दाखल झाली होती. तिने मुलीला जन्म दिला.
मात्र आपल्या नवजात शिशूची कोणतीही काळजी न घेता आणि डॉक्टरांना न सांगता ती तिच्या नवजात शिशुला हॉस्पिटलमध्ये सोडून पळून गेली होती. बीम्समध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात बीम्सच्या डॉ. सरोज यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली या संदर्भात बिबीजान सद्दाम
हुसेन सय्यद हिच्यावर आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला सोडून दिल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात क्र. क्र. १६०/२०२४ अन्वये ९३ बीएनएस गुन्हा दाखल आला. सदर महिलेला अटक करण्यात आली असून आज माननीय न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.