समाजसेवक केपीसीसी चे सदस्य आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच पाटबंधारे आणि बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक ( Personal Assistant ) श्री. मलगौडा पाटील* यांनी घेतली गरीब कु. सिमरन अनंत कोलकार हीची पुढील शैक्षणिक जबाबदारी
D Media 24 > Local News > *मलगौडा पाटील यांनी घेतली गरीब विद्यार्थिनीची घेतली शैक्षणिक जबाबदारी*
*मलगौडा पाटील यांनी घेतली गरीब विद्यार्थिनीची घेतली शैक्षणिक जबाबदारी*
Deepak Sutar14/12/2024
posted on
डी मीडिया वृत्तसेवा – बेळगाव प्रतिनिधी : तारीख 24 डिसेंबर 2024 : आंबेडकर गल्ली आगसगा तालुका बेळगाव येथील अनंत कोलकार यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला; त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.
कु. सिमरन आनंद कोलकार ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे; त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे पुढील शिक्षण घेणे अतिशय कठीण झाले असल्याकारणाने याचा सारासार विचार करून कै. अनंत कोलकार यांचे जवळचे *मित्र व स्नेही समाजसेवक केपीसीसी चे सदस्य आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच पाटबंधारे आणि बांधकाम मंत्री श्री. सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक ( Personal Assistant ) श्री. मलगौडा पाटील* यांनी आर्थिक मदत करून पुढील शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेतली आहे.
समाजामध्ये असे दुःखद प्रसंग घडत असतात पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही क्वचित व्यक्तींच्याकडे दिसून येतो त्याच्यामधिल एक व्यक्ती म्हणजे श्री मलगौडा पाटील हे उत्तम उदाहरण आहेत. अशाच प्रकारचे प्रसंग समाजामध्ये घडत असतात पण प्रत्येक जण आपण गांभीर्याने बघत नाही अशा विविध घटना समाजातील प्रत्येक व्यक्तींनी समजून घेऊन अशा गोरगरीब जनतेतील कुटुंबीयांना आणि होतकरू शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजामधल्या दानशूर दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे यायला हवे.
Leave a reply