जी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने.
संस्कृतीक,नैपुण्य, इलेक्ट्रोल लिटरसी या संघाद्वारे विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले,संस्कृतीक संघाद्वारे , दीपरंग,हस्तकुशल,गीत प्रवाह,नृत्य विहर,वेशभूषा या स्पर्धांचे आयोजन केले,
नैपुण्य संघाद्वारे, इंडियन स्ट्रिट फूड,हेल्दी सलाद, डेझर्ट,मेहंदी, रांगोळी, मंडला आर्ट,फेस पेंटींग, स्टोन पेंटींग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट,आदींचे आयोजन. तर इलेक्ट्रोल लिटरसी संघाद्वारे इंग्रजी, मराठी, कन्नडा, हिन्दी भाषेत निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
या विजेत्या स्पर्धकांना आज रोजी पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळाचे आयोजन के.एम. गीरी सभागृहामध्ये करण्यात आले.
या सोहळ्यास मंचावर महिला संघटनेच्याअध्यक्षा प्रा. रजनी नलगे,विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अनिल खाण्डेकर, टी.एल. सी. चे अध्यक्ष प्रा. प्रवीण पाटील, इलेक्ट्रोल लिटरसी संघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत सांबरेकर, संस्कृती संघ अध्यक्षा प्रा. डाॅ ममता कुट्टे,उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले,
हा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यासाठी प्राचार्य एस एन देसाई, उपप्राचार्य सचिन पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या व्यवस्थित आयोजनास विद्यार्थी परिषदेचे सदस्य,संस्कृतीक मंत्री सोहम शाहपूरकर, जनरल सेक्रेटरी निरंजन चिचणीकर,पावणी इरसंग, पनघा सीरी,यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन प्रा. जयश्री कनगुतकर, प्रा. ज्योती होसूरकर ,प्रा. दीपाली भांदुर्गे यांनी केले ,आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा अंकलकोपे यांनी केले.