अबकारी खटल्यातुन आरोपीची निर्दोष मुक्तता
नंदीहळ्ळी ता. बेळगांव येथील घटना अबकारी खटल्यातुन आरोपींची सबळ पुराव्या अभावी व साक्षिदारातील विसंगतीमुळे येथील तिसरे जे.एम. एफ. सी न्यायालयाचे न्यायाधीशानी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींचे नांवे
1) संतोष रायाप्पा चौगुले वय 24 वर्षे, धंदा शेती, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव.
2) रायाप्पा शिवाजी चौगुले वय 50, धंदा शेती, राहणार शिवाजी नगर, नंदीहळ्ळी, ता. जि. बेळगांव.
अबकारी साऊथ सब डिव्हीजन बेळगांव येथील फिर्यादी प्रेमसिंग एस. लमाणी अबकारी अधिकारी व तपास अधिकारी श्री. एस. एस. मुजावर अबकारी उप.निरिक्षक यांनी दाखल केलेल्या दोषारोप प्रकारे.
दिनांक 04/03/2019 रोजी ऑफीस मध्ये असताना खात्रीवायक बातमी मिळाली त्यानंतर पोलीस जिप घेवुन दुपारी 2.30 वाजता अबकारी पोलिस स्टाफ व दोन पंचाना घेवुन नंदीहळ्ळी गावातील ग्राम पंचायतीजवळ अबकारी ग्रस्त घालत असताना त्यावेळी खात्रीदायक बातमी आल्याच्या बातमी वरुन नंबीहळ्ळी गावातील शिवाजीनगर येथील आरोपी संतोष रायाप्पा चौगुले याच्या घरामध्ये जावुन शोध करुन घराचा तपास करत गेल्यानंतर घरातील स्वयंपाक खोलीमध्ये डायनिंग टेबलच्या खाली प्लॅस्टीक ट्रेमध्ये गोवा राज्यात विकण्यासाठी मात्र असा लेबल असलेली दारु आणि गोवा बिर टीन संग्रह करुन ठेवला होता.
त्या ट्रेमध्ये 21 लिटर गोवा दारु व 24 लिटर गोव्याची बीर त्याच्यात होती. सदरी आरोपीने अबकारी कायदे 1965 कलम 13 अ, 14, 15 32 (1) 34,38 (1) व 43 (२) प्रकारे कायद्याचा उल्लघंन केला.म्हणुन तिथेच जागावरच मुद्देमालाचा पंचासमक्ष पंचनामा करुन सदरी दारु व बीर पंचासमक्ष जप्त करण्यात आली.सदरी आरोपीला तिथेच अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर घर व घरातील विजेचे मिटर कोणाच्या नावावर आहे.
हे तपास केले असता सदरी घर व घरातील लाईट बील मिटर हे आरोपी रायाप्पा शिवाजी चौगुले यांच्या नांवावर नोंदणी आहे. असे समजले त्यामुळे सदरी रायाप्पा ह्याना ही ह्या केस मध्ये आरोपी करण्यात आले. त्यानंतर सदरी खटल्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते.आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.