“ओळखा बेळगाव शहर” अशा अनोखे मॉडेल प्रदर्शन
बेळगाव:येथील महिला विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये अनोखे मॉडेल प्रदर्शन भरविण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या कविता पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली ओळखा बेळगाव शहर अशा अनोख्या मॉडेल प्रदूषण विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
यामध्ये बेळगाव शहरातील विविध ठिकाणांचे मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यामध्ये बेळगावचा भुईकोट किल्ला,चन्नमा सर्कल,छत्रपती संभाजी महाराज सर्कल, एम एल आर सी,मिलिटरी महादेव, राजहंस गड, तसेच किल्ल्यात मधील दुर्गामाता देवीचे मंदिर, भाजी मार्केट त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील विविध हॉटेलचे मॉडेल सुद्धा विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
या मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागचा हेतू असा आहे.की विद्यार्थ्यांनी आपल्या शहराला किती ओळखला आहे. त्यांची स्मरणशक्ती किती आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्य कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्य कविता पुराणीकर यांनी सांगितले.