ॲपटेक एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांची मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी निवड
बेळगाव:प्रशिक्षण पूर्ण करून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी ग्रुपच्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन ॲपटेक एव्हिएशन ॲकॅडमीच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲपटेक एव्हिएशन ॲकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे या उपस्थित होत्या.
तसेच ज्योती बामणे व विनोद बामणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
लक्ष्मण कडबी,श्री राजीव नीलप्पनवर,साक्षी पाटील, स्वाती कोंडेकर, रक्षा फथन,प्रगती जालगार,प्रीती धारवाड,श्रीला पाटील,ईश्वरी कणबर्गी या विद्यार्थ्यांची मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी ग्रुपसाठी निवड झाली आहे.
याप्रसंगी विनोद बामणे बोलताना म्हणाले की हे विद्यार्थी ज्यावेळी आमच्याकडे आले.तेव्हा ते थोडे कच्चे होते अकॅडमी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्ञान आणि आत्मविश्वास वाढला.त्यांच्यामध्ये एक बदल निर्माण झाला. आज त्यांनी खडतर प्रयत्न करून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आदानी ग्रुपमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या यशामागे ॲपटेक एव्हिएशन ॲकॅडमी व त्यांच्या पालकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.