श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगांव: दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त जयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.सालाबाद प्रमाणे तिसऱ्या क्रॉस आनंदनगर वडगाव येथे श्री दत्त मूर्ती अभिषेक आणि दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता श्री दत्त मूर्ती अभिषेक आणि सायंकाळी साडेपाच वाजता श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा करण्यात येणार आहे तसेच रविवार दिनांक १५/१२/२०२४ रोजी दुपारी १२ ते ४ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.