आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याचा निषेधात रस्ता रोको
पंचमसाली समाजाच्या आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याचा निषेध करण्यासाठी आणि पंचमसाली समाजाचा दोन अ वर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंचमसाली समाजातर्फे पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
पंचमसाली समाजाचा दोन अ वर्गात समावेश करावा या मागणीसाठी
कुडलसंगमपिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.मंगळवारी आंदोलनकर्त्या वर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता.त्याचा निषेध करण्यासाठी बेळगावसह कर्नाटकात अनेक ठिकाणी पंचमसाली समाजाने आंदोलन छेडले.बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.यावेळी आंदोलनकर्त्यानी पंचम साली समाजाचा विजय असो,काँग्रेस सरकारचा धिक्कार असो,मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यानी केली.
रास्ता रोको मुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.काही वेळाने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.सोमवार पासून अधिवेशन सुरू असलेल्या सुवर्ण सौध समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय बसवजय मृत्युंजय स्वामीजीनी जाहीर केला आहे.