बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश – पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद
बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ या संस्थेबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या हक्कावरून गेल्या अनेक दिवसांपासून उच्च न्यायालयात प्रकरण होते. त्यावर 27 ऑगस्ट रोजी निकाल देताना संस्थेचे ट्रस्ट म्हणून असलेले अस्तित्व रद्द ठरवले होते.
तसेच सोसायटी कायद्यांतर्गत सोसायटीची नोंद केलेल्या संस्थेला पूर्वीचे समान नाव वापरता येणार नाही, असा निर्वाळा दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निकाला विरोधात संस्थेचे सचिव अर्जुन कृष्णा निलजकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
निलजकर यांच्या याचिकेवर 2 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाला मनाई हुकूम जारी केला. निलजकर यांच्या वतीने अॅड. संजय कटगेरी आणि अॅड. आनंद नुली यांनी काम पाहिले.