महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी देऊ नये ,महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना हद्दपार करावे अशी मागणी करत कन्नड रक्षण वेदिका संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.महामेळावा राजकीय हेतूने आयोजित केला जातो.महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर कारवाई करावी अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेने निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात जर कर्नाटकच्या बस अडवल्या तर कर्नाटकात महाराष्ट्राच्या बस अडवल्या जातील असे वक्तव्य देखील कन्नड रक्षण वेडिकेच्या म्होराक्याने निवेदन देताना केले.वीर राणी कितुर च अन्न मा चौकापासून जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेडीकेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यावर पोलिसांनी त्यांना अडवले.यावेळी त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झडली.अखेर पोलिसांनी त्यांना निवेदन देण्यासाठी परवानगी दिली.