तीन डिसेंबर हा दिवस वकील दिन म्हणून पाळला जातो.या वकील दिनाच्या दिवशीच कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे घडली आहे.आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव शशांक बटकोळी (१९) असे आहे.शशांक याने आपण राहत असलेल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
शशांक हा बागलकोट जिल्ह्यातील जम्बगी गावचा असून तो कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी चिकोडी येथे खोली घेऊन राहिला होता .त्याने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेचे वृत्त कळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच कॉलेज विद्यार्थ्यांनी तेथे गर्दी केली होती.