शेतकरी जोडाप्यावर दोन अस्वलानी केला हल्ला
खानापूर:शेतात काम करत असलेल्या शेतकरी जोडाप्यावर दोन अस्वलानी हल्ला करून गंभीर जखमी केले.बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माण गावातील शिवारात ही घटना घडली.अस्वलाच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.शेतात पती,पत्नी काम करत होते.
यावेळी अचानक दोन अस्वले शेतात आली आणि त्यांनी पती,पत्नीवर हल्ला केला.अस्वलांनी शेतकऱ्याच्या पायाचे लचके तोडले असून त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.सखाराम महादेव गावकर (६३) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.जखमी शेतकऱ्याला बेळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.