सहलीचे आयोजन करताना अडचणी
बेळगाव: शाळा म्हटलं की वार्षिक सहली या हमखास आल्याच. शाळांमध्ये शैक्षणिक वार्षिक सहलीच्या नियोजनाची तयारी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पण यावर्षी शाळांना शैक्षणिक सहलीसाठी केएसआरटीसी च्या बसेस उपलब्ध होणे अवघड झाले आहे. याचे कारण म्हणजे यावर्षी 9 डिसेंबर पासून बेळगाव येथे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे बसेस मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच शाळा व्यवस्थापनाला सहलीसाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
सहलीसाठी शाळा व्यवस्थापनाने किंवा मुख्याध्यापकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घेतली आहे. त्यांना परवानगी देण्यात आली आहे. सहलीसाठी बसेसचे नियोजन करताना त्यांचे त्रास होत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापनाला पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नियोजन केले आहे. डिसेंबर महिना संपण्याआधी त्यांना सहल पूर्ण करायची आहे.
त्यानंतर या वर्षातील परीक्षेच्या संदर्भातील विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांमध्ये सहली होणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांची सुद्धा तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. एकूणच आपल्या शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी वर्ग तयारीला लागला आहे. सहलीद्वारे खूप खूप मजा , आनंद घेण्याचे नियोजन त्यांनी चालवले आहे.