बेळगाव: बेंगलोर येथे २५ रोजी राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव मधील मंजिरी जीबी हिने प्रथम क्रमांक पटकवत सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे मंजिरी हिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कर्नाटक राज्यामधून अशी विशेष कामगिरी करणारी व सुवर्णपदक पटकावणारी बेळगाव जिल्ह्यातील ती पहिलीच मुलगी ठरली आहे. ती बेळगाव कॅम्प येथील सेंट जोसेफ स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक गिरीश हलभावी, मार्गदर्शक रमेश अलगुडेकर, पालक शिवदास जीबी, रेणू जीबी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्यामुळे अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डी मीडिया कडून तिचे खास कौतुक करण्यात आले .त्यामुळे तिने डी मीडियाचे आभार मानले.