बेळगाव:शहरातील जिल्हा रुग्णालय आवारात असणाऱ्या जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तपासणी केली.बंदी घातलेल्या आर.एल.एस आयव्ही ग्लुकोजचे अनेक बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बेल्लारी येथील हॉस्पिटलमध्ये आरएलएस आयव्ही ग्लुकोज वापरामुळे हॉस्पिटल मधील बाळंतिणीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे तज्ञांच्या अहवालानंतर सिद्ध झाल्याने आरोग्य विभागाने या ग्लुकोज वर बंदी घालण्यात आली आहे.या ग्लुकोजचा वापर न करण्याचे आदेश बजावले आहेत.
शनिवारी दुपारी लोकायुक्त एस.पी. हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली ८ अधिकाऱ्यांच्या पथकासह बेळगाव जिल्हा औषध गोदामावर छापा टाकून तपासणी केली.त्यामध्ये दहापेक्षा अधिक ग्लुकोजचे बॉक्स आढळून आले. त्याचप्रमाणे मुदत संपलेल्या औषधांच्या पेट्या मिळाल्या आहेत.
आर.एल.एस आयव्ही ग्लुकोज चा वापर सर्व हॉस्पिटलमध्ये न करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.