बेळगांव:तालुक्यातील देसूर येथील घटना पैसा कमवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी सरकार कडुन कोणतेही पास व परमीट नसताना स्वतःच्या जमिनीमध्ये मातीची उपसा करुन मातीवर पाणी सोडुन नंतर माती चाळण करून त्याच्यातुन वाळु काढुन शेतामध्ये बेकायदेशीर वाळुचा ढिग करुन त्यानंतर त्या वाळुची बरेच दिवस लोकाना विक्री करुन सरकारची फसवणुक करून वाळुची विक्री करुन सरकारला सुमारे 85,000/- रुपयेची फसवणुक व नुकसान केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता.
बेळगांव ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या खटल्यानुसार फिर्यादी बि. जे. नदाफ पोलीस सब इन्सपेक्टर बेळगांव ग्रामीण पोलिस ठाणा यांच्या फिर्यादीवरून.
दिनांक 28/07/2017 रोजी सरकारी जि.प. नं. के. 22-जे-0929 बेळगांव पोलिसाना बेळगांव ग्रामीण पोलीस ठाणा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना देसुर ग्राम हद्दीमध्ये संध्याकाळी ठिक 4.30 वाजता देसुर तालुका बेळगांव येथील जमिन सर्व्हे नं. 257 मध्ये मातीची उपसा करुन त्यावर पाणी ओतुन त्याच्यातुन वाळु काढुन ढिग मारुन ठेवले होते. त्यानंतर दोन पंचाना घेवुन व ग्रामपचायती सहाय्यक बाळु वसुलकर यांना घेवुन सदरी एक ब्रास वाळु जप्त केली. त्यानंतर सदरी जमिनीच्या मालकाचे नांव हणमंत लक्ष्मण काळसेकर रा. देसुर असे माहिती झाले व आरोपीने सरकार कडुन पास व परमीट न घेता सरकारला रुपये 85000/- रुपयचे वाळु विक्री करुन नुकसान केल्याचे असे समजुन आले.
त्यानंतर सदरी आरोपी हणमंत लक्ष्मण काळसेकर रा. देसुर, याच्यावर बेळगांव ग्रामीण पोलिसात भा.द. वि. कलम 420 व कलम 4 (1) (1अ) 21,22 एम. एम आरडी प्रकारे फिर्याद दाखल करुन आरोपीवर गुन्हा दाखल केला व त्यानंतर खटल्याचा पुर्ण तपास करून सदरी आरोपीवर येथील दुसरे जे. एम. एफ.न्यायालयात भा.व. वि. कलम ४२० कलमाखाली दोषारोप दाखल करण्यात आले.
येथील कुसरे जे.एम.एफ.सी. न्यायालयाने साक्षिदारातील विसंगतीमुळे सदरी आरोपी. हणमंत लक्ष्मण काळसेकर वय 50 वर्षे, धंदा शेती, रा. नद्दीहळी रोड, देसुर ता. जि. बेळगांव याची निर्दोष मुक्ततता केली.आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.