मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विजेत्या खेळाडूंचे बेळगाव रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत.
नुकत्याच सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या 14/17 वर्षा खालील राज्यस्तरीय बॉक्सिंग (मुष्ठीयुद्ध) स्पर्धा 20 व 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यानगर,बेंगळूर येथे पार पडल्या.
या राज्यस्तरीय स्पर्धेमधे बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण पदक,1 रौप्य पदक व 1 कास्य पदक जिंकत बेळगाव जिह्यामध्ये मानाचा तूरा रोवला आहे.
या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे यांचे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले त्यावेळी रेल्वे स्थानकावर मराठा मंडळ शाळेचे शिक्षक वर्ग,खादरवाडी गावचे ग्रामस्त,पालक वर्ग व आदी यांची प्रचंड गर्दी झाली होती.
प्रथम सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे खादरवाडी ग्रामस्त राकेश पाटील,रमेश माळवी,मनोज पिंगट,राहुल शिवनगेकर यांच्या हस्ते पुष्पहार व भगवा फेटा घालून स्वागत केले व खादरवाडी महिलांच्या वतीन आरती करुन गोड पदार्थ देउन राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेला शुभेच्या दिल्या.
कु.प्रताप शिवनगेकर 40kg (सुवर्ण पदक)
कु.मिझान सौदागर 60kg(सुवर्ण पदक)
कु.सेजल कांगले 70kg (रौप्य पदक)
कु.कैफ धामनेकर 38kg (कास्य पदक)
यावेळी खादरवाडी ग्रामस्त व शेतकरी संघटनेचे राकेश पाटील यांनी मुलांना शुभेच्या देत आपले मनोगत व्यक्त केले
त्यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या संस्थेच्या सन्मानीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे कायम प्रोत्साहन असतंय म्हणून त्यांचे प्रथम आभार व्यक्त केले व मुलाना शुभेच्या देत पुढील वर्षात मराठा मंडळ कडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधे नक्की पाठवू असे आश्वासन देत आपले मनोगत व्यक्त केले.
या सर्व खेळाडूना मराठा मंडळ संस्थेच्या सन्मानीय अध्यक्ष्या डॉ.राजश्री नागराजू (हलगेकर) व संस्थेच्या संचालक मंडळ यांचे बहुमूल्य प्रोत्साहन तर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले व शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.
सर्व विजेत्यांचे सर्वेकडे कौतुक होत आहे.