कडोली येथे भक्त कनकदास जयंती साजरी
बेळगाव: तालुक्यातील यमकनमर्डी मतदारसंघातील कडोली येथे गावामध्ये भक्त कनक दास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील हे उपस्थित होते.
सर्वप्रथम भक्त कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच काँग्रेस कार्यकर्ते राहुल जाधव यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.