बेळगाव : विश्वकर्मा मनुमय संस्था यांच्यावतीने पुढील तीन वर्षांसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. विश्वकर्मा मंदिर अनगोळ येथे रविवारी सकाळी समाजातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मावळते अध्यक्ष परशराम लोहार यांनी सर्वांचे स्वागत केले.आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी कार्याध्यक्ष म्हणून सागर लोहार,अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक अनिल मुचंडीकर,सचिव म्हणून सचिन सुतार, खजिनदार किरण लोहार यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून रमेश मुचंडीकर, उपसचिव अभिषेक राजू सुतार, उपखजिनदार बळीराम रमेश सुतार यांची निवड झाली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम मंडळामध्ये मनोहर सावंत सुतार, दशरथ लोहार, विशाल सुतार, आकाश सुतार यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार मंडळ म्हणून परशराम लोहार, नामदेव लोहार, मुरलीधर हिरामणी लोहार, दशरथ लोहार, महादेव लोहार, जगदीश लोहार व सुरेश सुतार या ज्येष्ठ नागरिकांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर व नूतन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वकर्मा देवाची पूजा करण्यात आली. मावळते अध्यक्ष परशराम लोहार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.