बेळगाव -येथील संभाजी उद्यानात होणाऱ्या जाहीर निषेध सभेसाठी उपस्थित राहिलेल्या कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपल्या अनेक मठांच्या मान्यवर स्वामींच्या समवेत कपिलेश्वर देवस्थानास सदिच्छा भेट दिली. मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष दौलत साळुंखे यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
कपिलेश्वर परिसराची स्वामीजींनी पाहणी केली आणि बेळगावात या तीर्थक्षेत्राचे चाललेले काम पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी “आपल्या कणेरी मठाची प्रेरणा घेऊन आम्ही येथील कार्य चालू ठेवले आहे” अशी माहिती कार्यकर्त्यांनी स्वामीजींना दिली. यापासून कपिलेश्वर ट्रस्टचे सर्वश्री अजित जाधव, राजू भातखंडे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, रमेश देसुरकर ,विकास शिंदे ,संतोष गुंजीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वामीजीं समवेत ४० विवीध मठाचे स्वामीजी होते. त्या सर्वांना कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट वतीने सन्मानित करण्यात सर्व स्वामीजींचे आगमन होताच ‘जय श्रीराम ,जय जय श्रीराम “अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला.मंदिराची पाहणी करून स्वामीजींनी संभाजी उद्यानात होणाऱ्या सभेसाठी पाचारण केले.