श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, शास्त्री नगर, बेळगाव येथे संत जलाराम यांची 225 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी गुजराथी समाजाच्या सर्व सभासदांमार्फत महाआरती करून रात्री प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंदाच्या प्रसंगी बेळगांव मधील सामाजिक संस्थांना प्रसादरूपी मिठाई व फळे वाटप करण्यात आली. आनंद यात्री वृद्धाश्रम, आर्ष विद्यामंदिर, माहेश्वरी अंध विद्यालय,चिक्कुंभीमठ अनाथालय आणि शांताई वृद्धाश्रम या स्वयंसेवी संस्थेतील सर्व सभासदांसाठी मिठाई, फळे व स्नॅक्सचे वितरण करण्यात आले. यासमयी गुजराती नवरात्र उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रमेशभाई लद्दड, उपाध्यक्ष बिपिनचंद्र पटेल, सचिव विजय भद्रा, खजिनदार पंकजभाई शाह, माजी अध्यक्ष धनंजयभाई पटेल, लखमशीभाई लद्दड, भूपेंद्रभाई पटेल, धरमसीभाई भानुशाली व विश्वस्त तसेच गुजराथी समाजाचे सर्व सदस्य उपस्थित होते.