बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीतही ही परंपरा अखंडित सुरू असून कृतिशील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव वार्ता न्युज पोर्टलच्या सुवर्णमहोत्सवी “ज्वाला”दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून मालोजी अष्टेकर बोलत होते. सोमवारी नेताजी सुभाषचंद्र बोस सांस्कृतिक भवन येथे “ज्वाला”दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी होते. सुरवातीला पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविकात “ज्वाला”च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा इतिहास आणि अनुभव सांगितले. व्यासपीठावर मालोजीराव अष्टेकर, आर.एम. चौगुले, शुभम शेळके, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी, शेखर पाटील, संपादक सुहास हुद्दार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी, मालोजीराव अष्टेकर, आर.एम. चौगुले, कृष्णा शहापुरकर, शुभम शेळके, शेखर पाटील, सी.एम. गोरल, सुहास हुद्दार, शिवानी पाटील यांच्या हस्ते “ज्वाला” दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
मालोजीराव अष्टेकर यांनी “ज्वाला”च्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच बेळगाव वार्ताचे संपादक कृष्णा मुचंडी यांनी 1970 च्या दशकात मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक कवी कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, कादंबरीकार रणजित देसाई, अनंत मनोहर यांच्या लेखणीने साकारला. ज्वाला”ला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ, उत्कृष्ट दिवाळी अंक असे तीन तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सीमाभागातील वाचकांसाठी वैचारिक मेजवानी “ज्वाला” देत आहे, असे देखील ते म्हणाले.
समिती नेते आर.एम. चौगुले, युवा नेते शुभम शेळके यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सी. एम. गोरल यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानी पाटील यांनी केले.कार्यक्रमास वार्ताचा वाचक वर्ग उपस्थित होता.