मयत सरकारी कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येचा सर्वंकष व जलद तपास व्हावा : राज्य भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके
बेळगाव,
बेळगाव तहसीलदार कार्यालयात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. मृत व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये गुन्हेगारांची नावे नमूद करण्यात आली असून बेळगाव शहर व जिल्ह्यात गुन्हेगार उपलब्ध असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग तपासात दिरंगाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सध्या काँग्रेस सरकारच्या कारभारात आणखी एक सरकारी कर्मचारी आत्महत्येचा बळी ठरला असून, या दिरंगाईमागे कोणाचा हात आहे, याचा तपास झाला पाहिजे, असे मत राज्य भाजपचे उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे, भाजप बेळगाव जिल्हाध्यक्षा गीता सुतार, भाजपचे ज्येष्ठ नेते व वकील एम.बी.जिरली उपस्थित होते.