औरंगजेबाचा फलक लावून वातावरण शांतता भंग करण्याचा प्रयत्न
बेळगांव: अजमनगर व शाहूनगर सर्कल येथील पेट्रोल पंप जवळ काही मुलांनी रविवारी रात्री औरंगजेबाचे बॅनर लावल्याने या भागात वातावरण रंग बनले. समाजकटकांनी लावलेल्या या बॅनरची माहिती पोलीस आणि मनपा प्रशासनाला देण्यात आली त्याचबरोबर तो बॅनर तात्काळ हटवून समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली.
महानगरपालिकेच्या आणि पोलिसांनी ते फलक हटवून दिले. दरम्यान यावेळी काहींनी प्रक्षोभक वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला.