मुंबई:( श्रीधर पाटील)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताचा पूर्णपणे व्हाईट वॉश करण्यात आला. भारताने पहिल्यांदाच न्युझीलँड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. हा भारताचा लाजिरवाना कसोटी मालिका पराभव झाला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेला तिसरा कसोटी सामना न्यूझीलंडने 25 धावांनी जिंकला आहे. भारताचा दुसरा डाव अवघ्या 29.1 षटकांमध्ये खल्लास झाला. भारताकडून फक्त विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने दुसऱ्या इनिंगमध्ये संघर्ष केला त्याने 64 धावांची खेळी केली. त्याची ही जिगरबाज खेळी भारताचा पराभव वाचवू शकली नाही. भारताकडून फक्त तीनच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली.
बेंगलोर येथे झालेली पहिली कसोटी भारताने आठ गाड्यांनी हरली तर पुणे येथे झालेली दुसर दुसरी कसोटी 113 धावांनी हरली तर मुंबई येथे झालेली तिसरी आणि अंतिम कसोटी भारताने 25 धावानी हरली आहे. न्युझीलँडने पहिल्या डावामध्ये 235 धावा केल्या होत्या तर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 263 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये 28 धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून पहिल्या डावांमध्ये रवींद्र जडेजा याने पाच विकेट आणि सुंदर वॉशिंग्टन यांनी चार विकेट घेतल्या होत्या.
न्युझीलँडकडून एजाज पटेल ने भारताच्या पाच फलंदाजांना तंबूत परत पाठवले होते.दुसऱ्या इनिंगमध्ये न्युझीलँडने सर्वबाद 174 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 147 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. मात्र भारताचा दुसरा डाव 121 धावांमध्ये संपुष्टात आला.
नाम बडे और दर्शन छोटे याचा अनुभव दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांकडून दिसून आला. कर्णधार रोहित शर्मा ,सरफराज खान,विराट कोहली, शुभमान गील, यशस्वी जयस्वाल हे भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे भारताने हा सामना इथेच गमावला होता.पण ऋषभ पंत क्रेझवर असे पर्यंत भारताला विजयाची अशा होती.मात्र पंतची विकेट पडल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला.