मराठी भाषिकांनी काळा दिन पाळून मूक सायकल फेरी काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त केला.पोलिसांनी आणि प्रशासनाने फेरीला परवानगी नाकारली होती तरीही मराठी भाषिकांनी फेरी काढून मराठी बाण्याचे दर्शन घडवले.
बेळगाव,कारवार,निपाणी,बीदर,, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे अशा घोषणा देत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते.धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला प्रारंभ झाला .
दंडावर काळया फिती बांधून मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते.१९५६ साली भाषावार प्रांत रचना झाल्यावर बेळगाव आणि सीमाभाग मराठी भाषिक सत्तर टक्क्यांहून अधिक असून देखील अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला.तेव्हापासून गेली ६८ वर्षे मराठी भाषिक एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून आपला महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करतात.शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता झाली.