राज्यस्तरीय स्पर्धेत मन्निकेरी गावातील युवकाने उत्तम कामगिरी करत कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक व सुवर्णपदक मिळविले आहे.
२६/१०/२०२४ रोजी शाळा शिक्षण विभाग कर्नाटक यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय क्रीडा व खेळ स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडांगण कनकपुर जिल्हा रामनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देवगिरी गावातील बनशंकरी विद्यालय काकती येथील विद्यार्थी द्रुवा केंपन्ना खोजगणाट्टि यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
द्रुवा यांने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.