दिपावली हा सण सम्पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण दिव्यांचा, गोडाधोडाचा,अंधारावरील प्रकाशाच्या विजयाचा ,. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस ,शुभारंभ, प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आम्ही गल्लीमध्ये हट्टीहोळी (बुरजाई )गल्ली बुरजाईदेवी मंदिरासमोर गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली.तसेच श्री बुरजाईदेवीचे पूजन करण्यात आले. आपले शेतकरी बंधू वर्षभर शेतामध्ये आपल्या जनावरासोबत काबाडकष्ट करतात. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज हा सण साजरा केला जातो .
याप्रसंगीमाजी महापौर महेश नाईक रतन मुगळीकर ,सुभाष गवळी, सुरज गवळी , किरण गवळी, सविता मुगळीकर, दीपा नाईक, रेखा बाचीकर, अलका बाचीकर,आशा रावळ, गंगा नाईक, सुमन आडाव,अश्विनी आडाव, यल्लूबाई रावळ, विमल जाधव, सुरेखा गंधवाले, शालिनी नायडू ,सरोजा जाधव ,नीलम जाधव, विमल बाचीकर, लता बाचीकर, सुजाता बाचीकर, आशा नाईक असे सर्वजण उपस्थित होते. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबियांना सुखाची, समृद्धीची ,आणि भरभराटीची जावो, अशी समस्त गल्लीतर्फे प्रार्थना करण्यात आली.