बेळगाव: वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेला युवकांच्या कारचा भीषण अपघात यामध्ये तिघेजण गंभीर जखमी आहेत.
काल रात्री होनगा येथे कारचा अपघात झाला. कार भरधाव वेगाने डिव्हायडरला आदळून जवळून जात असलेल्या बसला आदळी त्यानंतर कार स्वराज्य धाब्यामध्ये शिरली तर या अपघातात बस व धाब्यामधील लोकांना काही झाले नाही. या कारमधील ५ युवक जखमी झाले.तर त्यामधील ३ युवक गंभीर जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे.
मिळालेली माहितीवरून हे युवक काकतीवेस बेळगाव येथील रहिवासी आहेत. या घटनेचे काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.