पुणे: येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्युझीलंडने दुसऱ्या इनिंगमध्ये पाच बाद 198 धावा केल्या होत्या. तसेच पहिल्या डावांमध्ये 103 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आता न्यूझीलंडकडे 301 धावांची एकूण आघाडी झाली आहे. अजूनही त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत. तसेच सामन्याचे तीन दिवस बाकी आहेत. त्यांनी सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. सामना वाचवण्याचा प्रयत्न भारताने करणे गरजेचे आहे. पण हे शक्य वाटत नाही. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे काही होऊ शकते.
खेळाच्या पहिल्या दिवशी भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदर याने सात विकेट घेऊन चांगली कामगिरी केली होती. शुक्रवारी त्याने न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना तंबूत परत पाठवले. आर. अश्विन याने एक फलंदाज बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या डावांमध्ये 259 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावांमध्ये फक्त 156 धावा केल्या त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात 103 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात त्यांनी 198 धावा केल्यामुळे त्यांची आघाडी एकूण 301 धावाची झाली आहे.
भारताच्या पहिल्या डावामध्ये रवींद्र जडेजा ने सर्वाधिक 38 धावा केल्या. मीचेल याने भारताच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावांमध्ये चांगली फलंदाजी केली. त्यांनी खेळ थांबला तेव्हा पाच बाद 198 धावा केल्या होत्या. टॉम ब्लेंडेल तीस धावांवर तर ग्लेन फिलिप्स नऊ धावांवर नाबाद आहे. शनिवारी दुपारपर्यंत डाव घोषित करून न्युझीलँड भारताला मोठे लक्ष देण्याच्या तयारीत आहे. सामना आणि मालिका जिंकण्याच्या दिशेने न्युझीलँडचा प्रयत्न सुरू आहे. जर असे झालेतर तब्बल बारा वर्षानंतर मायदेशात टीम इंडियाचा कसोटी मालिका पराभव होणार आहे. तसेच मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकलेल्या विजय रथाला लगाम बसणार आहे.
23 वर्षानंतर अशी वेळ(bold)
2001 सालानंतर कसोटी मालिकेत सलग दोन सामन्यात शंभरहून अधिक धावांची पिछाडी भारतीय टीमवर येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये शंभरहून अधिक धावांनी पिछाडीवर राहिला होता.
दुसऱ्या इनिंगमध्ये न्युझीलँडतर्फे टॉम लॅथम याने सर्वाधिक 86 धावा केल्या. त्याला विल यंग आणि टॉम ब्लेंडर यांनी चांगली साथ दिली. आता भारतापुढे सामना वाचवणे हाच एक पर्याय शिल्लक आहे. सामना आणि मालिका गमावल्यास भारताचे डब्ल्यूटीसी रँकिंगमधील स्थान घसरणार आहे.