बेळगांव : KLE VK Institute of Dental Sciences ने कराड येथे झालेल्या “Cynodent International Conference” मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयाला दोन प्रतिष्ठित पदव्या देण्यात आल्या.”सर्वोत्कृष्ट नामांकित दंत महाविद्यालय”आंतरराष्ट्रीय पातळी आणि “सर्वात विद्यार्थी-अनुकूल दंत महाविद्यालय” अशी दोन प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयाने उत्कृष्ट वैज्ञानिक सादरीकरणासाठी 21 पुरस्कार मिळवले.
सांस्कृतिक कार्यक्रमात कॉलेजने फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.ग्रुप डान्स आणि ड्युएट सिंगिंग स्पर्धेमध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
कला स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम तर फेस पेंटिंगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
आदरणीय प्राचार्य डॉ.अलका काळे, उपप्राचार्य डॉ. अंजना बागेवाडी, डीन डॉ. विनायक कुंबोजकर आणि विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष, डॉ. सागर जालिहाल आणि डॉ. चेतन बी. यांच्या अतुट सहकार्य आणि मार्गदर्शन करत त्यांचे आभार मानले.