बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात राहणाऱ्या गंगानगौडा रुद्रगौडा पाटील वय (७७) यांचे सोमवारी निधन झाले असून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.दिवंगत व्यक्तीच्या शेवटच्या इच्छेनुसार बैलहोंगलच्या डॉ.रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचे डोळे KLE डॉ.प्रभाकर कोरे नेत्रा भंडार यांना दान करण्यात आले आहे .
त्यामुळे मृत्यू नंतर देखील अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाशझोत निर्माण झाला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. पाटील कुटुंबीयांनी नेत्रदान केलेल्या डॉ. रामण्णवरा ट्रस्टचे सचिव डॉ.महांतेश रामण्णवरा यांनी पाटील कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
नेत्र, त्वचा आणि शरीर दानाबद्दल अधिक माहितीसाठी *डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टशी ९२४२४९६४९७* या क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे