बेळगाव:बंगळुरातील बसवणगुडी जलतरण तलावावर नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी वर्चस्व गाजविले. बेळगावच्या जलतरणपटूंनी ५४ सुवर्ण, २० रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली.
श्रीकांत देसाई, सिमरन गौंडाळकर, अनिकेत पिळणकर, स्वतिक पाटील, राघवेंद्र अणवेकर, शरण्या कुंभार, प्रज्वल नारळेकर, साहिल जाधव, पृथ्वी नारळेकर, चिन्मय केमण्णावर, प्रज्वल हनुमट्टी, अमोघ तंगडी, सोनम पाटील, रम्या लमाणी यांनी प्रत्येकी तीन
सुवर्णपदके पटकावली. अमोल कांबळे, योगेश पाटील व सुकृत येलहट्टी यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण व एक रौप्य, सई पाटील व बसू माळी यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण, सुमित मुतगेकर व साक्षी पाटील यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व दोन रौप्य, स्वयंम बांदिवडेकर, पवन मुलिमनी व सोंदर्या दंडीन्नवर यांनी प्रत्येकी तीन रौप्य, प्रवीण दोड्डण्णावर व कविता मडिवाळर यांनी प्रत्येकी
दोन रौप्य तर मारुती कोप्पद यांनी तीन कांस्यपदके पटकावली. सर्वजण स्वीमर्स व अक्वेरियस स्वीम क्लबचे जलतरणपटू असून केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुड्डुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.