राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत एम.एम.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याने पटकाविले कास्यपदक
बेळगांव:12 ऑक्टोंबर 2024 रोजी बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल बेळगाव इयत्ता ९वी चा विद्यार्थी श्री अथर्व अभिजित मोरबाळे याने ७५ की खालील वजन गटा मधील कराटे स्पर्धेत कांस्य पदक मिळवले.
त्याच्या या यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) मॅडम यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री आर सूर्यवंशी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित व प्रेरणा दिली.एम एम इंग्लिश मीडियम स्कूल बेळगावच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथर्व याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.