सुपीक जमिनीच्या मोबदल्यात परिहार साठी पाण्यात उभ राहून कर्नाटक सरकारचा निषेध
*बेळगाव ग्रामीण अतिवाड बेकिंनकेरे भागातील शेकडो शेतकऱ्यांचा अतिवाड बंधाराखाली गेलेल्या सुपीक जमिनीच्या मोबदल्यात परिहार साठी पाण्यात उभ राहून कर्नाटक सरकारचा निषेध करत आगळावेगळा आंदोलन आज अतिवाड गावातील बंधाऱ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेते प्रकाश नाईक, वेळोवेळी या शेतकऱ्यांच्या सरकारकडून मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे करणारे मराठा समाजाचे, बेळगाव तालुका एपीएमसी संचालक विनय विलास कदम यांच्या उपस्थितीत उपस्थितीत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता हे अतिवाडचे धरण बांधले आहे व लवकरात लवकर कर्नाटक सरकारकडून सर्व शेतकऱ्यांना मोबदला कसे मिळेल हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मिळवून द्यायची गव्हाही दिली, या बेळगाव तालुका एपीएमसी सदस्य विनय विलास कदम साहेब बोलताना म्हणाले की म्हणाली की जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आपण कदापिही स्वस्थ बसणार नाही व कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देणार,
आजचे आंदोलन हे कर्नाटक सरकारला फक्त एक इशारा आहे की शेतकऱ्यां वरती होणारा अन्याय तात्काळ दूर करावा व सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा किंवा पर्याय म्हणून पर्याय म्हणून अतिवाड गावची 60 एकर जमीन एकर जमीन अक्रम सक्रम योजनेखाली सरकारने घेतली आहे तर कमीत कमी ज्या शेतकऱ्यांचे जेवढे क्षेत्रफळ या बंधाऱ्यासाठी गेलेले आहे तेवढे क्षेत्रफळ या जमिनीत त्या शेतकऱ्याला मिळावा व कायदेशीर जो काय मोबदला आहे तो मोबदला सुद्धा मिळावा व जोपर्यंत हा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आपण कधी स्वस्त बसणार नाही असे कदम साहेबांनी सांगितले यावेळी उपस्थित अतिवाड बेकिंनकेरे परिसरातील शेतकरी, मराठा संघटन बेळगाव तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, बेकिंनकेरे पंचायत अध्यक्ष छबूबाई शंकर कांबळे, उपाध्यक्ष सावंत, ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई गावडे, भरमा वहरकेरी, मल्लाप्पा पाटील, पुंडलिक सावंत, गावडू पाटील, आनंद पाटील, यल्लाप्पा पाटील, सातेरी केसरकर, बाळू वैजू पाटील, हनुमंत पाटील,स्नेहा तोरे, लक्ष्मी केसरकर, गंगाराम सावंत सावंत आधी उपस्थित होते.*