त्या मूक जनावराच्या मदतीला धावले तुडवेकर
शनि मंदिर येथे एका कुत्र्याला काही लोकांनी बिबट्यासारखे रंगवले होते. बिचारे ते मुक जनावर अंग खाजवत फिरत होते. कारण त्याच्या अंगावर रंगने पेंट केल्यामुळे ते अस्थावेस्थहोते.त्यामुळे त्या त्याला वेदना होत होत्या.
अंगावर खाज आल्याने खाजवल्याने त्याला जखमा झाल्या होत्या . सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कुत्र्याच्या अंगावरील पेंट काढण्याचा प्रयत्न केला. त्याला धुतले मात्र पेंट काढता येत नव्हता. त्यामुळे बेळगावातील जनतेने कुत्र्यांना कलर न लावता निर्दयी पद्धतीने मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.