नाविण्य महिला मंडळने पटकावले मंगळागौर स्पर्धेचे विजेते पद
एंजल फाउंडेशन च्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर माणिक बाग येथील जैन बोर्डिंग मध्ये पार पडली यावेळी जवळपास 16 महिला मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
या स्पर्धे करीता व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त रहदारी वाहतूक आणि विभागाच्या पी व्ही स्नेहा, जानकी सेवा संघाचे संस्थापक आणि समाजसेवक डॉक्टर उमेश आचार्य आणि त्यांच्या पत्नी गायत्री आचार्य एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी जवळपास 16 महिला मंडळांनी मंगळागौरच्या गाण्यांवर आपली कला सादर केली.
याप्रसंगी परीक्षक म्हणून विद्या जोशी आणि पूजा कारजोळ उपस्थित होत्या. यावेळी प्रथम क्रमांक नाविण्य महिला मंडळ द्वितीय क्रमांक रेणुका महिला मंडळ तृतीय क्रमांक शिवकन्या महिला मंडळ आणि उतेजार्थ स्फूर्ती सांस्कृतिक ग्रुप यांनी पटकाविला यावेळी विजेत्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रथम क्रमांकाला दहा हजार द्वितीय क्रमांकाला सात हजार आणि तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.