https://www.instagram.com/reel/CyGMUAUhD39/?igshid=MWZjMTM2ODFkZg==
गर्लगुंजी ,नंदिहळ्ळी ,नागेनहट्टी, के के कोप या भागातील शेतकऱ्यांनी आज रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना सर्वे करिता आल्या असता त्यांना हाकलले. आज बेळगाव धारवाड रेल्वेसाठी प्राथमिक सर्वे करण्याकरिता रेल्वे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ता करिता आलेल्या पोलिसांना येथील शेतकऱ्यांनी हाकलले.
याआधीही शेतकऱ्यांनी चार वेळा गर्लगुंजीच्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना वापस माघार घेण्याकरिता भाग पाडले होते मात्र आज या सर्वांनी अधिकाऱ्यांसह फौज फाटा घेऊन बेळगाव धारवाड रेल्वे मार्ग करण्याकरिता दाखल झाले होते.
यावेळी शेतकऱ्यांनी आपला रेल्वे मार्गाला विरोध नसून फक्त पडीक जमिनीतून मार्ग काढावा अशी मागणी केली ज्यामुळे पाच किलो मी अंतर कमी होईल आणि सुपीक जमिनी वाचतील असा प्रस्ताव शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता.
मात्र अधिकाऱ्यांनी न ऐकता आज मोठा पोलीस फौज फाटा घेऊन शेतकऱ्यांना विरोध करण्याकरिता दाखल झाले होते मात्र यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांना माघारी धाडले.
त्यावेळी विरोध करण्याकरिता आलेल्या शेतकरी गर्ल गुंजी नंदीहळ्ळी आणि नागेनहट्टी या भागातील शेतकरी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दोन्हीचे परीक्षण केले आणि आपला विभागातर्फे रिपोर्ट सरकारकडे सुपूर्द करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी एपीएमसी संजय मादर नंदीहळ्ळी उपाध्यक्ष मल्लिकार्जुन लोकुर शेतकरी प्रसाद पाटील राजेश पाटील परशराम जाधव किरण लोंढे रमेश राऊत गजानन जाधव मारुती राऊत हनुमंत मेलगे पुंडलिक मेलगे यशवंत पाटील सोमनाथ पाटील कला पाल लोहार महेश पाटील संतोष पाटील भुजंग धामणेकर यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.