नव्या दारू दुकानांना परवानगी नाही
राज्य सरकारने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मद्य दुकानांना परवानगी देण्याचा विचार चालिवल्याचे वृत्त काही दिवसांपासून आहे. सरकारच्या या भूिमकेला तीव्र विरोध व्यक्त झाला आहे. आता या चर्चेला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णिवराम दिला आहे.चित्रदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मद्य दुकाने सुरू करण्याबाबत आपल्या मंत्र्यांनी विचार चालिवला होता. मात्र, आपले सरकार नवी मद्य दूकाने सुरू करणार नाही. असे स्पष्ट केले तीन हजारापेक्षा अिधक लोकसंख्या असलेल्या खेड्यांमध्ये मद्य दुकाने सुरू करण्यास परवाना देण्यात येईल.
सुपर मार्केट, मॉलमध्ये मद्यविक्रीला परवानगी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर राज्यभरात आंदोलने सुरू असल्याने सरकारने हा प्रस्ताव मागे घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यात नव्या मद्य दुकानांना परवानगी देणार नसल्याचे खुद्द सिद्धरामय्यांनीच सांगितले आहे. 6 अनुदानाची कमतरता नाही राज्यात गॅरंटी योजना आणि विकासकामांसाठी अनुदानाची कमतरता नाही. राज्यात दुष्काळामुळे ५२ टक्के पीकहानी झाली आहे. केंद्रीय अध्ययन पथकाला दुष्काळाविषयी केंद्र सरकारकडे वस्तुस्थिती मांडण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले.