वनखात्याने आता त्या प्राण्याला पकडण्याकरिता कंबर कसली
बेळगांव:आज सकाळपासून वनखात्याने अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वनराई परिसरात मोहीम आखून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे या ठिकाणी गाडी सुद्धा वन खात्याने लावली आहे .या भागात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला असल्याने वनखात्याने आता या प्राण्याला पकडण्याकरिता कंबर कसली आहे.
तसेच हा बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचा नागरिकांनी दावा केला असून त्याला पकडण्याकरिता आता वनविभागाने तपास हाती घेतला आहे आज सकाळी शुक्रवारी येथे प्राण्यांचे ठसे काही नागरिकांना दिसले.
त्यानंतर त्यांनीच लागलीच वना खात्याला याबाबत माहिती दिली. यावेळी वनखाता यांनी ताबडतोब या ठिकाणी शोधमोहीम राबविली. गेला काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरात व शास्त्रीनगर परिसरात कोल्हा नागरी वस्तीत आढळून आला होता .त्यामुळे त्याला जेरबंद करण्यात आले होते.
तर आता अनगोळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भागांमध्ये सीसीटीव्ही बसवावे तसेच अनेक ठिकाणी जाळ्या पिंजरा बसवाव्यात जेणेकरून हा प्राणी कोणता आहे समजेल आणि तो पिंजरामध्ये अडकून राहील अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.